Tuesday, 12 March 2019

चुंबन

चुंबन

तिच्या मानेवर ओठ टेकवल्यावर त्याला पुन्हा आठवलं
कि त्या चुंबनातलं मुलायमपण त्याला नंतर कधीच आठवत नाही

'किती घेतली असतील गं मी तुझ्या मानेची चुंबनं?'
मी ते मुलायमपण जतन करण्याच्या असफल प्रयत्नाच्या शेवटात होतो

तिनं पटकन खणातून एक वही काढली आणि म्हणाली
''छत्तीस हजार सहाशे बावीस. नाही, आत्त्ताचं वाढवून तेवीस ..... '

'wow, म्हणजे दिवसाला किती गं?'
मी पटकन मोबाईल मधला calculator काढला

आणि अचानक आठवेनाच कि किती दिवस ओळखतो आहोत आम्ही एकमेकांना
आणि ते पहिलं मुलायम चुंबन.....

ती चहाचा झुरका घेत म्हणाली, 'ते नाही लिहून ठेवलेलं मी
तुझं तू शोध.....'
'मी सांगतो demantia होणार आहे मला म्हातारपणी'
मी चहाचा घोट घेत म्हणालो

माझ्या ओठावरचं मुलायम चुंबन तिच्या वहीच्या आकड्यात सामील झालं होतं

प्रमोद
१५ जानेवारी २०१९

No comments:

Post a Comment