कवीच्या पिंडाला कावळा शिवत नसतो तेव्हा
त्याच्या मनात राहिली असतेएखादी कविता अपूर्ण?
का
राहून गेलेलं असतं
सगळ्या कविता शोधून
त्यांची होळी करणं,
ती राख फासून
आत्मप्रेमात फिकट झालेली पाटी
काळीकुट्ट करून ठेवणं
चुकून पुन्हा कवीचाच जन्म मिळाला तर?
पुन्हा तो कोरा करकरीत
ठळक
मंगलमय
शब्द उमटावा म्हणून
आत्मप्रेमात फिकट झालेली पाटी
काळीकुट्ट करून ठेवणं
चुकून पुन्हा कवीचाच जन्म मिळाला तर?
पुन्हा तो कोरा करकरीत
ठळक
मंगलमय
शब्द उमटावा म्हणून
प्रमोद
१५ जानेवारी २०२२