ऐसे नाही
तुजपाशी शोधिले जे
गवसले सगळेच ऐसे नाही
हरवले ऐसा कयास होता
हरवलेच होते ऐसे नाही
चिरडले जीव किती
पायदळी, शोधतांना वाटा नव्या
टाळले चालण्याचे मी
पांगुळलोच होतो ऐसे नाही
अगणित रिचवले प्याले
धुंडाळले मार्ग निषिद्ध
चुकलो असेन दिशाही
भरकटलोच होतो ऐसे नाही
भिजवले तुजला चिंब
ठिबकलो पागोळ्यांतुनी
भासलो रिता जरी
बरसलोच होतो ऐसे नाही
प्रमोद
तुजपाशी शोधिले जे
गवसले सगळेच ऐसे नाही
हरवले ऐसा कयास होता
हरवलेच होते ऐसे नाही
चिरडले जीव किती
पायदळी, शोधतांना वाटा नव्या
टाळले चालण्याचे मी
पांगुळलोच होतो ऐसे नाही
अगणित रिचवले प्याले
धुंडाळले मार्ग निषिद्ध
चुकलो असेन दिशाही
भरकटलोच होतो ऐसे नाही
भिजवले तुजला चिंब
ठिबकलो पागोळ्यांतुनी
भासलो रिता जरी
बरसलोच होतो ऐसे नाही
प्रमोद
No comments:
Post a Comment