शेवटची कविता
निघून गेलोय मी, निघून गेलोय.
तुझ्या उशाशी एक मोठ्ठा पूर्णविराम सोडून
शोधलं असशील मला, जागोजाग
भौतिक गोष्टीत, मित्र आप्तेष्टांत
सापडलोच नसेन. न्हवतोच सापडणार
शेवटी हतबल होऊन बसली असशील,
माझी कवितांची वही घेऊन
सर्वात पहिल्यांदी इथंच शोधलं असतंस तर भेटलो सुद्धा असतो
कविता शोधणारा सापडलो असतो मी इथंच
शोधत शोधत इथवर पोहोचली असशील तर
आता शोधायची गरज भासते आहे का अजून?
वाच पुन्हा सगळ्या ओळी, खाडाखोड आणि रिकाम्या जागा
...... आहे गरज?
प्रमोद
१८ डिसेंबर २०१८
निघून गेलोय मी, निघून गेलोय.
तुझ्या उशाशी एक मोठ्ठा पूर्णविराम सोडून
शोधलं असशील मला, जागोजाग
भौतिक गोष्टीत, मित्र आप्तेष्टांत
सापडलोच नसेन. न्हवतोच सापडणार
शेवटी हतबल होऊन बसली असशील,
माझी कवितांची वही घेऊन
सर्वात पहिल्यांदी इथंच शोधलं असतंस तर भेटलो सुद्धा असतो
कविता शोधणारा सापडलो असतो मी इथंच
शोधत शोधत इथवर पोहोचली असशील तर
आता शोधायची गरज भासते आहे का अजून?
वाच पुन्हा सगळ्या ओळी, खाडाखोड आणि रिकाम्या जागा
...... आहे गरज?
प्रमोद
१८ डिसेंबर २०१८
No comments:
Post a Comment