ब्लेड
तो प्रेमात पडलाय ब्लेडच्या
चकचकीत, धारदार, परखड, निर्लज्ज ब्लेड
त्याला वाटायला लागलंय ब्लेड जादूगार
नाजूकपणे पुढं सरकलं कि लालसर एक रेष मागं सोडणारं
त्याला खात्रीये कि ब्लेडच्याच अंतरंगातूनच स्रवतंय चित्र
त्या ब्लेडवर राहिलेलं इवलंसं रक्त त्याला पोएटिक वाटतंय
तासंतास तो न्याहाळतोय धारदार पातं ब्लेडचं
डोळ्याच्या अगदी जवळ नेत
शेकडो चित्रं काढलीयेत त्यानं स्वतःच्या देहावर
ह्या माध्यमाच्या शक्यता आजमावण्यासाठी
शुद्ध हरवतांना जाहिरात टाईप करतोय
'शरीरं' हवीयेत भाड्याने
आणि रक्ताचे ओघळ घेरतायेत ब्लेडचे भरलेले पुडे
प्रमोद
१२-०३-२०१९