दुःखावर प्रेम करू नये
दुःखाचा दुःस्वासही नये करू
दुःखाने मिळते हवे हवेसे
सांत्वन
स्वावलंबनाच्या तोऱ्यात असलेल्या
अलिप्त देहाला
मिळतो
प्रेमळ स्पर्श किंवा घट्ट मिठी
गुप्त होतात वठलेले
पुरातन वृक्ष दुःखाचे
दूरवर पसरलेली
मुळं अन पारंब्या.
हलकं वाटतं.
दुःख असलेला
सगळ्यांना दिसायला लागतो
'ठळक'
दुःख बनून जातं
पुरावा
अस्तित्वाचा
दुःख प्रेमळ वाटतं
दुःख सुंदरही वाटतं
प्रेमात पडावं असं
मग दुःखाचा शोध
सुरू होतो
आणि भेटलंच नाही
मनस्वी दुःखं
तर गोल्डप्लेटेड किंवा
चायना मेड ही चालावं
इतकं लागतं
दुःखाचं व्यसन
आणि एकदा सापडलं,
'दुःखं' म्हणता येईल असं काही की
आंजारलं गोंजारलं जातं
छान सजवून प्रस्तुत केलं जातं
मखरात बसवून
दुःखाचं असणंच
कधी सुख बनून जातं
आणि दुःखाचं नसणं, 'दुःखं'
कळतच नाही
दुःखाचं व्यसन लागलं की
सुखी असल्याचा वाटायला लागतो जाच
किंवा
सुखी असल्यावर वाटायला लागतं
अपराधी
कुठलंही प्रामाणिक दुःखं
करत नाही उद्धार स्वतःचा
खऱ्या दुःखाचं मनस्वीपण
सोसलेल्या प्रत्येकाला
माहित असतं
ते काय घेऊन जातं
आणि
काय देतं
अशी मनस्वी दुःखं सोसलेली माणसं
भेटतात मोकळेपणाने
दुःखं असो वा सुखाला
जगण्याचा प्रवासात भेटलेल्या
कुणा एकासारखे
सुखाचे जल्लोष करत नाहीत
ना दुःखाचं प्रदर्शन
अलिप्त राहतात
सुखात किंवा दुःखात
कोरडे नाही होऊन जात
आणि
व्यसनीही
ते फेडतात पांग
भेटलेल्या सुख दुःखाचे
ओठावर हसू ठेऊन
'ठळक'
दुःख बनून जातं
पुरावा
अस्तित्वाचा
दुःख प्रेमळ वाटतं
दुःख सुंदरही वाटतं
प्रेमात पडावं असं
मग दुःखाचा शोध
सुरू होतो
आणि भेटलंच नाही
मनस्वी दुःखं
तर गोल्डप्लेटेड किंवा
चायना मेड ही चालावं
इतकं लागतं
दुःखाचं व्यसन
आणि एकदा सापडलं,
'दुःखं' म्हणता येईल असं काही की
आंजारलं गोंजारलं जातं
छान सजवून प्रस्तुत केलं जातं
मखरात बसवून
दुःखाचं असणंच
कधी सुख बनून जातं
आणि दुःखाचं नसणं, 'दुःखं'
कळतच नाही
दुःखाचं व्यसन लागलं की
सुखी असल्याचा वाटायला लागतो जाच
किंवा
सुखी असल्यावर वाटायला लागतं
अपराधी
कुठलंही प्रामाणिक दुःखं
करत नाही उद्धार स्वतःचा
खऱ्या दुःखाचं मनस्वीपण
सोसलेल्या प्रत्येकाला
माहित असतं
ते काय घेऊन जातं
आणि
काय देतं
अशी मनस्वी दुःखं सोसलेली माणसं
भेटतात मोकळेपणाने
दुःखं असो वा सुखाला
जगण्याचा प्रवासात भेटलेल्या
कुणा एकासारखे
सुखाचे जल्लोष करत नाहीत
ना दुःखाचं प्रदर्शन
अलिप्त राहतात
सुखात किंवा दुःखात
कोरडे नाही होऊन जात
आणि
व्यसनीही
ते फेडतात पांग
भेटलेल्या सुख दुःखाचे
ओठावर हसू ठेऊन
प्रमोद
२१ ऑगस्ट २०२४
२१ ऑगस्ट २०२४