Friday, 22 November 2019

स्प्लिट पर्सनॅलिटी 


निघताना हात विलग होतात तेव्हा
तू माझ्या बरोबर येतेस आणि मी तुझ्याबरोबर


म्हणूनच दिवसाचा प्रवास करून घरी परतल्यावर
आपण विचारत नाही एकमेकांना,
'कसा होता आजचा दिवस?'

मी तुला तू परत करून टाकतो आणि तू मला मी

प्रमोद
२२-११-२०१९

No comments:

Post a Comment