Friday, 15 November 2019

एकदा.....


ऐकू येतात,
सगळीकडे, नेहमी
तुझी पावलं

ऐकू येतात,
त्यासोबत,
पावलांवरच्या भेगा
खांद्यावरचं वजन

भेगा, माझ्या फिरस्तीचं देणं
आणि वजन,
पापाच्या खटल्यात
जमा केलेल्या बनावट कागदपत्रांचं,
पुनर्निवाड्याच्या अर्जांचं.
पुण्य म्हणून गोळा केलेल्या
आयुष्यातल्या प्रवाहात सापडलेल्या
गुळगुळीत गोट्यांचं

कितीदा आडोश्याला उभ्या तुला पाहायला
हलकेच आलो आहे
पण तू नसतोसच
डोळे बंद केल्यावर जाणवतात श्वास
पण तू नसतोसच

एकदा समोर ये ना 

तुझ्या पायांना मलम लावायचंय
चेपायचे आहेत खांदे
बसायचं आहे
तुझ्याभोवती असलेल्या
परिपूर्ण अभावाच्या वलयात
एकदा.....

१५-११-२०१९

No comments:

Post a Comment