Thursday, 2 May 2024

नैतिक


डोळे मिटले आहेत देवाने
टोचतीये प्रत्येक नजर
अपेक्षांनी ओतप्रोत भरलेली

कौतुकाच्या कवनांतली
महती पुनःपुन्हा ऐकून
त्याला झालंय अजीर्ण

LEDचे रंगीत दिवे
भगभगीत हॅलोजननी
विकल झालीये दृष्टी

paparazzi कॅमेरे रोखून
टिपत राहतात हालचाल
प्रत्येक उच्छवास

उंची वस्त्रांची
फुलांच्या ढिगांची
उबग येतीये त्याला

देवाला privacy हवीये
तो म्हणतो आहे
भक्तांनी पाळावी
नैतिक जबाबदारी

कुणाचाही एकांत
भंग न करण्याची

त्याला वाटतंय
शाप द्यावा ज्यानं
सगळे विसरून जातील त्याला

म्हणजे उंची पार्ट्यात भेटणारा मित्र
चहाच्या टपरीवर भेटल्यावर
जश्या गप्पा होतात
तश्या जिवाभावाच्या गप्पा होतील
सुदाम्याचे पोहे खात

प्रमोद
०२ मे २०२४

No comments:

Post a Comment