Wednesday, 28 October 2020

लेग पीस


डोक्यात गोळी घातलेला कोणी
ओंडक्यासारखा आपटला जमिनीवर
काळजात चर्रर्र झालं
जेव्हा त्याचं डोकं आपटलं

भाकड होती ती वेदना
तो आधीच मेलेला होता
गोळी मेंदूत शिरतानाच 

गोळीचा वेग 
माझ्या सहवेदनेच्या वेगापेक्षा 
होता 
कितीक पटीने जास्त

तो आपटला
त्याक्षणी
मी होतो
एक प्रेक्षक फक्त
चिकन ६५ खाणारा

चिकन ६५ च्या गाड्यावरचा
उघडाबंब माणूस
भल्या मोठ्या कढईत
तळत होता
नुकत्याच मेलेल्या माणसाचा
लेग पीस

प्रमोद
१७ सप्टेंबर २०२०

No comments:

Post a Comment