बाहेरचाही न्हवतो
ना आतला
नुसताच संचार करणारा
इथून तिथे
संचारबंदीत कळलं
किती खोल्या आहेत
आत
किती कपाटं
किती कप्पे
किती चोरकप्पे
किती कट्यारी
किती मोरपिसं
वाळवी,
कचराकुंड्या
देव्हारे
समया
तंबोरे
खेद
नाद
लिंपल्या काही
बांधल्या काही
भिंती
काही लांधल्या
खूप दिवसांनी
बाहेर आल्यावर
भास होते
सगळेच नवे
बाहेर बदलला आहे?
का आत?
का,
दोघांची सापेक्ष स्थिती
संचारबंदीत?
प्रमोद
१३ जून २०२०
ना आतला
नुसताच संचार करणारा
इथून तिथे
संचारबंदीत कळलं
किती खोल्या आहेत
आत
किती कपाटं
किती कप्पे
किती चोरकप्पे
किती कट्यारी
किती मोरपिसं
वाळवी,
कचराकुंड्या
देव्हारे
समया
तंबोरे
खेद
नाद
लिंपल्या काही
बांधल्या काही
भिंती
काही लांधल्या
खूप दिवसांनी
बाहेर आल्यावर
भास होते
सगळेच नवे
बाहेर बदलला आहे?
का आत?
का,
दोघांची सापेक्ष स्थिती
संचारबंदीत?
प्रमोद
१३ जून २०२०
No comments:
Post a Comment