Monday, 17 February 2020

अगम्य


लिहिलेलं तेच,
वाचणारा तोच

उमगत नाही कधी
कधी लख्ख उमगतं

काळ कुजबुजत राहतो
स्वतःचा एक अनुवाद
प्रत्येक क्षणाचा
अखंड

त्याचा आणि आपला स्वर
जुळतो तेव्हा
होतो दगडाचा विठ्ठल
आणि देहाचा तुकोबा


प्रमोद
१७/०२/२०२०

No comments:

Post a Comment