सकाळी उठल्यावर
दिवस होता ऊसासारखा
पिळण्यासाठी तयार
घट्ट पकड त्यावर
पिळवटणाऱ्या सांधीत
कोंबायला साजेशी
जाणवायला लागलेला
नाकाला
गोडसर वास
चेहेऱ्यावर पिळताना
उडणारे शिंतोडे
गोडसर वास
चेहेऱ्यावर पिळताना
उडणारे शिंतोडे
तिनं हात हातात घेतला
नाजूकपणे
लेकींनी मिठी मारली
अगदी निघतांना
कानात नेमका
तुकोबा कुजबुजून गेला
मोबाईल वरून
कामावर पोहोचे पर्यंत
दिवस झाला
पाखरू
उडून गेला
वाटेतल्या जंगलात
प्रमोद
०६ फेब्रुवारी २०२०
No comments:
Post a Comment