ते एक झाड
रोजच्या वाटेवरलं
इथल्या काळ्या थंडीत
मागचे अनेक महिने निष्पर्ण असलेलं
सगळे पक्षी सोडून गेलेले
बोचरा झोंबणारा वारा
चिराळलेली वल्कलं अंगावर
कंगाल दिसणारं
काही नसण्याचं दुःख
कुठंच कधीच दिसलं नाही
एकही रेषा न्हवती किल्मिशाची
रोज जाता येता
तितक्याच सौहार्दपूर्ण आलिप्ततेनं
पाहात असायचं मला
ते नेहमी
एखादा योगी
वाटायचं मला
अचल निश्चल
एका अलिप्ततेनं
वाहणाऱ्या काळाकडे पाहणारं
आता काही दिवसात
तेच बहरून जाईल
जगातली उंची वस्त्रं लेऊन
लगडतील फांद्या
मधुरोत्तम फळांनी
सुरु होईल लगबग
अनेक पाहुण्यांची
सांडेल सूर्याचं केशर भोवताली
पसरतील रंगीत गालिचे सर्वदूर
मी सुद्धा
ह्या आनंदात उन्मत्त
भरभर निघून जाईन
रोजच्या वाटेने
पाहीन फक्त मोहक
हवंहवंसं
ते तरीही
तितक्याच सौहार्दपूर्ण आलिप्ततेनं
पाहात राहील मला,
किंवा प्रत्येकाकडं
माझ्या असण्याच्या
नंतर सुद्धा
ते तेव्हाही असेल
एखादा योगी
अचल निश्चल
एका अलिप्ततेनं
वाहणाऱ्या काळाकडे पाहणारं
ते एक झाड
मला ते झाड व्हायला जमायला हवं
...... किंवा कुठलंही
प्रमोद
०१ एप्रिल २०२०
रोजच्या वाटेवरलं
इथल्या काळ्या थंडीत
मागचे अनेक महिने निष्पर्ण असलेलं
सगळे पक्षी सोडून गेलेले
बोचरा झोंबणारा वारा
चिराळलेली वल्कलं अंगावर
कंगाल दिसणारं
काही नसण्याचं दुःख
कुठंच कधीच दिसलं नाही
एकही रेषा न्हवती किल्मिशाची
रोज जाता येता
तितक्याच सौहार्दपूर्ण आलिप्ततेनं
पाहात असायचं मला
ते नेहमी
एखादा योगी
वाटायचं मला
अचल निश्चल
एका अलिप्ततेनं
वाहणाऱ्या काळाकडे पाहणारं
आता काही दिवसात
तेच बहरून जाईल
जगातली उंची वस्त्रं लेऊन
लगडतील फांद्या
मधुरोत्तम फळांनी
सुरु होईल लगबग
अनेक पाहुण्यांची
सांडेल सूर्याचं केशर भोवताली
पसरतील रंगीत गालिचे सर्वदूर
मी सुद्धा
ह्या आनंदात उन्मत्त
भरभर निघून जाईन
रोजच्या वाटेने
पाहीन फक्त मोहक
हवंहवंसं
ते तरीही
तितक्याच सौहार्दपूर्ण आलिप्ततेनं
पाहात राहील मला,
किंवा प्रत्येकाकडं
माझ्या असण्याच्या
नंतर सुद्धा
ते तेव्हाही असेल
एखादा योगी
अचल निश्चल
एका अलिप्ततेनं
वाहणाऱ्या काळाकडे पाहणारं
ते एक झाड
मला ते झाड व्हायला जमायला हवं
...... किंवा कुठलंही
प्रमोद
०१ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment