तुझा हात हातात घेतला कि
निरखून पाहात राहतो
तुझ्या हातावरच्या रेघा
शोधत राहतो ते आडवळण
जिथून सोबत घेतलंस
सैरभैर भरकटणाऱ्या मला
किंवा सोडलास राजमार्ग
धरलीस वाट निबिड
झालीस सारथी
करत राहिलीस मलमपट्टी
मी हट्टानं धारण केलेल्या
जखमांची
शांतपणे...
स्मृती तुझ्यासाठी
प्रमोद
३०/०१/२०२०
प्रमोद
३०/०१/२०२०
No comments:
Post a Comment