Thursday, 25 July 2019

GIF


स्क्रीनवरचं GIF
भेदरवून टाकतं मला
एखाद्या अपशकुना सारखं
विचित्र


कधी कधी अस्वस्थ होऊन
थांबवू जातो त्या GIF ला
घाई घाईनं डबल क्लिक
करतो अनेक


काही काळ बघत राहतो
होतीये का सुटका ते
मग घाईनं बंद करतो
ब्राऊसर


उघडल्यावर ब्राऊसर
ते निरर्थक
बिनडोक GIF
वागत सुटतं अखंड


'GIF'ophobia सर्च
करतो google वर
शट डाऊन करून
निघतो


काही काळ
सायकल चालवल्यावर
एक क्षण घाबरतो
प्रचंड


ब्रेक मारल्यावर
थांबतात पाय
साला किती भारी
मी GIF नाहीये

प्रमोद
२४ जुलै २०१९

No comments:

Post a Comment