Tuesday, 16 July 2019

कंस!


मी होतो प्रवासी
पाप पुण्याची झोळी
खांद्याला टांगून फिरणारा


तिला हवं होतं वीर्य
आणि मला
स्खलनाच्या क्षणातली अवर्णनीय अनिवार्यता


तिनं मागितली डबी ते वीर्य साठवायला
मला हाताला लागली सामानातली
बाळकृष्ण ठेवायची डबी


बाळकृष्ण मग झोपून गेला
पलंगाच्या हिंदोळ्यांवर झुलत


ती पडून राहिली नग्न
काही वीर्य स्वतःत
आणि काही त्या डबीत साठवून
स्वतःच्या पूर्णत्वाचं मृगजळ धुंडाळीत
आणि मी
मांडून बसलो पाप पुण्याची कोष्टकं


आणि बाळकृष्ण
गाढ झोपला होता
कंस मामाची वाट पाहात


प्रमोद
१६ जुलै २०१९

No comments:

Post a Comment