तुझ्या उघड्या पाठीवर बोटांनी काढलेलं पेंटिंग
वाटतंय जमायला लागलंय
काळ्याकुट्ट अंधारात स्पर्शांचे काजवे
रंगीत तलमपण फुलपाखरासारखं, अल्लड
कुंचल्याला सापडलीये लय, वजन
पुरता गवसलेला कॅनवासचा अवकाश
गायक समाधीच्या अवस्थेत जसं बांधतो
काळाच्या पोकळीत जादुई जग
ऐकणाऱ्या कानांच्या संख्येनं
तशी
तुझ्या त्वचेच्या पेशीत
भरलीयेत चित्रांची प्रदर्शनं
एक चांगलंय,
खूप चांगलंय
पेंटिंगचं संपणं माझ्या हातात उरत नाही
तू वळतेस आणि घेतेस आवेगानं मिठीत
तो शेवटचा मास्टर स्ट्रोक झिंगलेला
जातो कॅनवासच्या बाहेर
आणि बरंय,
राहून जाते
सही
प्रमोद
२७ जून २०१९
काळाच्या पोकळीत जादुई जग
ऐकणाऱ्या कानांच्या संख्येनं
तशी
तुझ्या त्वचेच्या पेशीत
भरलीयेत चित्रांची प्रदर्शनं
एक चांगलंय,
खूप चांगलंय
पेंटिंगचं संपणं माझ्या हातात उरत नाही
तू वळतेस आणि घेतेस आवेगानं मिठीत
तो शेवटचा मास्टर स्ट्रोक झिंगलेला
जातो कॅनवासच्या बाहेर
आणि बरंय,
राहून जाते
सही
प्रमोद
२७ जून २०१९
No comments:
Post a Comment